कृषि उत्पन्न बाजार समिती, भिवापूर

प्रस्तावणा

कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूर ता. भिवापूर जिल्हा नागपूर या समितीची स्थापना महाराष्ट्र शेती उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम क. सी. ओ. पी/५६ भिवापूर दि. २० मार्च १९६१ द्वारा कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९५६ च्या कलम ३ चे उपकलम (१) नुसार अधिसुचना क्मांक ए. पी. एम २०६७/ ३१४०/४ (१) सी - १ दिनांक १२ जुन १९६८ ला झाली. प्रत्यक्ष कामकाज दिनांक २० जुलै १९६८ रोजी सुरूवात झाली.

कार्यक्षेत्र

बाजार समितीची स्थापना झाली तेव्हा कार्यक्षेत्र ५ मैलाचे होते. यानंतर अधिसुचना क्रमांक सी. आर/आर/भिवापूर ७० दि. ३० जानेवारी १९७१ नुसार अधिनियम १९६३ चे कलम ४ उपकलम ३ प्रमाणे समितीचे कार्यक्षेत्र भिवापूर पंचायत समिती क्षेत्रापुरते वाढविण्यात आले व पंचायत क्षेत्राचे पुढे तालुक्यात रूपांतर झाले वन व महसुल विभाग अधिसुचना क. आर. ई. एम/२४८५/४४९७/सी. आर. १४४-एम १० दि. २९ जुलै १९८५ अन्वये भिवापूर तालुक्याची पुर्नरचना होवून १३७ गावांचा समावेश करून कार्यक्षेत्र मर्यादीत करण्यात आले.

नियंत्रीत शेतमाल

वरील कार्यक्षेत्रात नियमन केलेले सर्व शेतमाल मिरची व अन्न धान्य, कुक्कूटपालन, जनावरे, शेळयामेंढया, कापूस, पालेभाज्या, फळे भाज्या, गुरांचे वैरण, विडयाची पाने, इमारती जळाऊ लाकडे, कडधान्य व्दिदल धान्य, हळद, सुर्यफूल, करडई इत्यादी शेतमालाचे नियमन केले असुन समितीचे मुख्य यार्डावर बाजार भरत आहे. जनावरांचा बाजार सरकारी जागेत भरत असुन या बाजारावर समितीचे नियंत्रण आहे.

मार्केट यार्ड

समितीला मुख्य बाजार यार्ड भिवापूर करीता शासनाकडुन ६.४६ एकर जागा मोफत मिळाली असुन समितीचे ९ एकर जागा खरेदी केली आहे. दुय्यम बाजार बेसूर करीता ग्राम पंचायत बेसूर येथे ५.५ एकर जागा दानमात्र दिली आहे. त्याच प्रमाणे नांद उपबाजार करीता नांद येथे ७.७५ एकर जागा खरेदी केली आहे. बेसूर उपबाजार २८/११/१९८३ व नांद येथे उपबाजार दि. १६/११/१९९६ ला स्थापन केला आहे.

संचालक मंडळ

बाजार समितीच्या स्थापनेच्या वेळी समितीचे ३ वर्षात संचालक मंडळ शासन नियुक्त होते. समितीचे कामकाज व विकासाचे दृष्टीने संचालक मंडळाचा कार्यकाल ५ वर्ष वाढ करून लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आले. समितीची सन २०२३-२०२४ ते २०२७-२०२८ पावेतो नविन संचालक मंडळाची निवडणूक दि. ०६/०५/२०२३ ला झाली असुन दि. २४/०५/२०१३ ला संचालक मंडळाची प्रथम सभा झाली असुन सभापती या पदावर मा. श्री. बाळू मुरलीधरजी इंगोले व उपसभापती या पदावर मा. श्री. चंद्रशेखर लक्ष्मणराव ढाकूणकर यांची नियुक्ती झालेली असून सध्या समितीचे कामकाज पाहत आहेत.

ट्रान्सपोर्ट व्यवस्था

भिवापूर मुख्य बाजार यार्ड नागपूर ते नागभिड चंद्रपूर या राष्ट्रिय माहामार्गावर बसस्टॅन्डला लागुन आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांचे माल वाहतुकीची व्यवस्था अतिशय सोयीची आहे.

प्रसिध्दी

समिती दरवर्षी बाजाराबाबत रूपरेषा दैनिक पेपरला जाहिरात देऊन प्रसिध्दी करीत आहे. त्याच प्रमाणे बाजाराचे दिवशी लाऊड स्पीकर वरून बाजार व्यवहाराची रूपरेषा कळविली जाते तसेच शेतक-यांना मोबाईल व्दारे वॉट्स ॲप द्वारे बाजार भावाची माहिती शेतकरी ग्रुप वर दिली जाते.

गोदाम

मार्केट यार्डात संस्थेची २०० मे. टनाचे दोन गोदामे आहेत. भिवापूर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त बाजार भाव मिळावा व त्यांची गरज पुर्ण व्हावी हा हेतू लक्षात ठेवून समितीने १००० मे. टन गोडाऊनचे बांधकाम केलेले आहे सदर गोडाऊनचा उपयोग शेतमाल तारण योजने करीता केल्या जातो व शेतक-यांना शेतमाल तारण योजनेमुळे शेतमालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याचा समितीचा उद्येश आहे .. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजना प्रभाविपणे राबविल्याने सन २०१७-२०१८ या वर्षाचा शेतमाल तारण योजना पुरस्कार "ब" वर्गातुन महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळालेला आहे

समिती प्रगतीपथावर

कृषी उत्पन्न बाजार समिती, भिवापूर ही दिवसें दिवस प्रगती करीत आहे. शेतक-यांची विश्वास पात्र समिती असल्यामुळे समितीचे उत्पन्नात वाढ होत आहे. समितीकडे स्वतःचे मालकीची २०० मे. टनाचे २ गोडाऊन, १००० मे. टनाचे १ गोडाऊन, ६ ओटा शेड, २ ओपन ओटे, मार्केट यार्डात पिण्याचे शुध्द व थंड पाण्याकरीता वॉटरफिल्टर, तसेच समितीचे मार्केट यार्डात सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

समितीने शेतक-यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या या करीता शेतक-यांचा शेतमाल खाली पडून मातीत मिसळू नये याकरीता समितीचे मार्केट यार्डात दोन ओटयामधील खाली भागात सिमेंट रोड तसेच ओटा शेडच्या चारही बाजुने १५ फुटाचे सिमेंट काँकीटीकरण केलेले आहे. त्यामुळे शेतक-यांचा शेतमालाचा मोजमाप करतांना खाली पडलेला माल उचलणे सोयीस्कर झालेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूरला एका विशेष नावाने ओळखल्या जाते, ति म्हणजे भिवापूरी मिरची. भिवापूर हे नाव मिरचीसाठी प्रसिध्द असुन देशात तिचा लौकीक फार मोठया प्रमाणात आहे. भिवापूरी मिरचीमुळे जगाच्या नकाशावर भिवापूर ला मानाचे स्थान मिळाले असुन ती आपल्या साठी अभिमानाची बाब आहे. भिवापूर तालुक्यात भिवापूरी मिरची बरोबर जास्त उत्पादन घेणा-या मिरचीची लागवड फार मोठया प्रमाणत घेतल्या जाते. भिवापूरी मिरचीला G1 नामांकण मिळाल्याने ती भिवापूर साठी तसेच आपल्या बाजार समितीसाठी अभिमानास्पद आहे.