- Agricultural Mortgage Loan Scheme 2017-18: Third Prize
- Bhivapur Agricultural Produce Market Committee: Annual General Meeting | Keynote Attendance: Hon. Shri Rajendraji Mulak, Hon. Shri Shyamkumarji Barve, Hon. Shri Sanjayji Meshram.
आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी कृ. उ. बा. समिती भिवापूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी माजी मंत्री मा. श्री. राजेंद्रजी मुळक यांनी खासदार मा. श्री. श्यामकुमारजी बर्वे व आमदार मा. श्री. संजयजी मेश्राम यांच्यासह उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या सभेत मागील वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील काळातील कार्ययोजना निश्चित करण्यात आल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना, तसेच समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधा यांवर सविस्तर चर्चा झाली.
